खरेदीसाठी आलेल्या महिलेची ८५ हजार रोकड चोरली,अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल
पिंपरी; पिंपरी मेन मार्केट येथे लग्नाच्या खरेदीसाठी आलेल्या एका महिलेची पैशांची पिशवी फाडून अज्ञात चोरट्यांनी ८५ हजारांची रोकड पळवली.
सुनिता अनवा तामचीकर (वय ५०, रा. पिंपरी) यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तामचीकर सोमवारी दुपारी पावणे एक वाजताच्या सुमारास पिंपरी मार्केट येथे लग्नाच्या खरेदीसाठी आल्या होत्या. अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची पैशांची पिशवी फाडून त्यातून ८५
हजारांची रोख रक्कम चोरून नेली. हा प्रकार दुपारी तीन वाजता उघडकीस आला.
पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!