गाईंना कत्तल करण्यासाठी नेणाऱ्या ४ जणांवर गुन्हा दाखल,चिखली पोलिसांची कामगिरी
चिखली; कत्तल करण्यासाठी गाई वाहून नेणाऱ्या चार जणांवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम कलम 9, 5 (अ), 5 (ब) व प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम कलम 11 (घ) (ड) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खंडू सुभाष पाटील (वय २१), इर्शाद हमिद कुरेशी, युसुफ रज्जाक कुरेशी, फारुख सत्तार कुरेशी (वय ३७, सर्व रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस नाईक दीपक मोहिते यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास आरोपींनी एका वाहनामध्ये ३ गाईंना कत्तल करण्यासाठी भरले. याबाबतची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी वाहनावर कारवाई करून चौघांवर गुन्हा दाखल केला. त्यातील खंडू पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे.
पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!