सोशल मिडीयावर कोयते दाखवून व्हिडीओ व्हायरल करणारे ३ आरोपी गजाआड,गुन्हे शाखा, युनिट-६ ची कामगिरी

हडपसर;सोशल मिडीयावर कोयते, तलवार, पालघन इत्यादी हत्यारे हातात घेवून व्हिडीओ बनवून व्हायरल करून दहशत निर्माण करणा-या ३ जणांवर कारवाई.लोणीकंद पोलीस स्टेशन मध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नितिन सुंदर दहीरे (वय २२ रा. नविन म्हाडा बिल्डींग नं.११ हिंगणे मळा,हडपसर पुणे),अनिकेत अशोक कुंदर (वय २२ रा. नाईकनवरे बिल्डींग, घर नं.७ डी मार्टच्या मागे, ससाणेनगर हडपसर पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,युनिट ६ च्या हद्दीत गस्त करत असताना पोलिसांना माहिती मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी हडपसर येथे फिरत आहेत.मा.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचुन कोयते, तलवार, पालघन हातात घेवून व्हिडीओ बनूवन ती सोशल मिडीयावर व्हायरल करून दहशत पसरविणाऱ्या आरोपीस अटक केले. आरोपी विरुध्द लोणीकंद पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्याराचा कायदा कलम ४(२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.

सदरची उल्लेखनिय कामगिरी मा.पोलीस आयुक्त,पुणे शहर,श्री अमिताभ गुप्ता, मा.पोलीस सह आयुक्त डॉ.रविंद्र शिसवे, मा.अपर पोलीस आयुक्त,गुन्हे,श्री.अशोक मोराळे, मा.पोलीस उप-आयुक्त गुन्हे, श्री.श्रीनिवास घाडगे, मा.सहा.पोलीस आयुक्त,गुन्हे-२,श्री.लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट-६ चे पोलीस निरीक्षक, श्री.गणेश माने, सपोनि.नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, नितीन मुंढे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर, नितीन धाडगे, शेखर काटे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.