भारतनगर झोपडपट्टी मधून सव्वा चार लाखांची ब्राऊन शुगर जप्त,दोन महिलंसह एक साथीदारावर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड; पिंपरी मधील भारतनगर झोपडपट्टी मधून पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सव्वा चार लाखांची ब्राऊन शुगर जप्त केली.महिला आरोपीला अटक केली आहे.
डिका सागर थोरात (वय ३६), रीना बाबा रणदिवे (दोघे रा. भारतनगर झोपडपट्टी, पिंपरी), स्वामी अण्णा (रा. सायन मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यातील डिका हिला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डिका जवळ ब्राऊन शुगर असल्याची माहिती अमलीपदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास भारतनगर झोपडपट्टी मधील लक्ष्मी मंदिराच्या जवळ सापळा रचून आरोपी डिका हिला ताब्यात घेतले. आरोपींकडून ४ लाख २५ हजार रुपये किमतीची ८५ ग्रॅम ब्राउन शुगर पोलिसांनी हस्तगत केली. आरोपीने ही ब्राऊन शुगर विक्रीसाठी स्वतःकडे ठेवली होती. दरम्यान तिची बहीण रिना फरार असुन याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!