पुणेकरांसाठी आनंदाची बातमी!आता पुणे राज्यातील सर्वात मोठे शहर

पुणे; महापालिकेच्या हद्दीमध्ये अखेर २३ गावांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडुन घेण्यात आला आहे. यामुळे आता महापालिकेची हद्दवाढ झाली असून ५१८.१६ स्केअर किलोमिटर इतके क्षेत्र झाले आहे. मुंबईचे क्षेत्रफळ ४३८ स्केअर किलोमिटर असून राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने पुणे ही सर्वात मोठी महापालिका आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये ३४ गावांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता असताना ३४ गावांचा समावेश महापालिकेच्या हद्दीत करण्यात यावा असा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर गावे घेण्यास उशिर झाल्यामुळे गावकऱ्यांना न्यायालयात जावे लागले होते. त्यामुळे २०१७ साली महापालिकेच्या हद्दीत ११ गावांचा समावेश करण्यात आला. २०२० पर्यंत ३४ गावे महापालिकेच्या हद्दीमध्ये घ्यावीत असे शपथपत्र राज्य सरकारकडुन उच्च न्यायालयात देण्यात आले होते. महापालिकेच्या हद्दीमध्ये २३ गावांचा समावेश झाल्यामुळे याठिकाणी महापालिकेला पायाभूत सुविधा द्याव्या लागणार आहेत.

आता पाणी, ड्रेनेज, स्वच्छता, शिक्षण यांसारख्या सुविधा महापालिकेला सुरुवातीला या भागात उभ्या कराव्या लागणार आहेत. २३ गावांचा समावेश झाल्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेवर तान येण्याची शक्यता आहे.या गावंची सध्या ४ लाख लोकसंख्या आहे. या गावांचे क्षेत्र सध्या पीएमपआरडीएच्या हद्दीत असून गावांचा विकास आराखडा सुध्दा तयार करण्यात आलेला आहे. त्यामुळे गावांचा स्वतंत्र विकास आराखडा करण्यात येणार का, पीएमआरडीएचा विकास आराखडा लागू होणार हे अद्याप निक्षित झालेलं नाही.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.