नगरसेविका अर्चना मुसळेची बदनामी करणारी पत्रके वाटली म्हणून नागरिकाची मारहाण,दोघांवरही अदखलपात्र गुन्हा दाखल

औंध; पुणे महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अर्चना मुसळे यांचा पतीने आणि भावाने इमारतीत राहणाऱ्या एका नागरिकाला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत चतुःशृंगी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना मुसळे या भारतीय जनता पक्षाच्या औंध प्रभागातील नगरसेविका आहेत. औंध परिसरातीलच क्लोरियन पार्क या इमारतीत त्या राहत असुन, मारहाण करण्यात आलेली व्यक्ती देखील याच इमारतीत राहते. संबंधित व्यक्तीने मुसळे यांच्या विरोधात बदनामी करणारी पत्रके वाटली असल्याचा आरोप करत ही मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोघांनीही एकमेकांविरोधात तक्रारी दिल्या आहेत.

त्यानुसार पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.