अल्पवयीन मुलीचा विवाह करणाऱ्यांवर गुन्हा दाखल,वुमन्स हेल्पलाईन पथकाची उल्लेखनीय कामगिरी

पिंपरी चिंचवड; पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचा कोल्हापूर जिल्ह्यातील मुलासोबत विवाह लावण्यात आला. याबाबत वुमन्स हेल्पलाईनच्या प्रयत्नांमुळे विवाह लावणाऱ्यांवर आणि पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयसिंगपूर येथे एका अल्पवयीन मुलीचा विवाह झाला असल्याचे वुमन्स हेल्पलाईनच्या सदस्यांना समजले. त्यानंतर सदस्यांनी संबंधित पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक तसेच महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सवालाखे यांना माहिती देण्यात आली. सुरुवातीला वयाचा पुरावा न मिळाल्याने पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला नाही. मात्र, वुमन्स हेल्पलाईनच्या सदस्यांनी मुलीच्या वयाचे पुरावे गोळा करून पोलिसांसमोर सादर केले असता, याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. सर्वांच्या प्रयत्नांमुळे १५ वर्षीय मुलीचा १९ वर्षीय मुलासोबत लावलेला विवाह मोडून मुलीची सुटका करण्यात आली. तसेच पती आणि त्याच्या सात नातेवाईकांवर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई, वुमन्स हेल्पलाईनच्या अध्यक्षा नीता परदेशी, उज्वला बोभाटे, दीपा कुलकर्णी, सोनाली साठे, अॅड.सारिका परदेशी यांनी केली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.