किरकोळ वादातून तरुणावर तलवारीने वार,नऊ जणांच्या टोळीवर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवड;फिर्यादी देवदास कुत्रा फिरवण्यासाठी गेला असताना,तिथे झालेल्या वादाची पोलिसात तक्रार दिली. या कारणावरून नऊ जणांनी मिळून एका तरुणावर तलवारीने वार केले. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना भाटनगर पिंपरी येथे घडली.

देवदास मोहन मलकेकर (वय २०, रा.भाटनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुभाष माचरे, जयदेव सुभाष माचरे, राजतिलक सुभाष माचरे (तिघे रा. भाटनगर, पिंपरी), अजय परदेशी, विकी गायकवाड मळ्या, आशिष (पूर्ण नाव नमुद नाही) आणि अन्य तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचे आणि आरोपींचे भांडण झाले. आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत फिर्यादी यांनी पिंपरी पोलीस चौकीमध्ये आरोपींच्या विरोधात तक्रार दिली.या कारणावरून आरोपीने फिर्यादी यांच्या घरासमोर जाऊन ‘तू आमच्या विरुद्ध तक्रार का दिली.असे म्हणत बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी यांना तलवारीने वार करुन जखमी केले. आरोपीवरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.