धक्कादायक!डॉक्टर डे च्या दिवशी डॉक्टर दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या
वानवडी;नवविवाहित डॉक्टर पती पत्नीची किरकोळ वादानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याच्या वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी हा प्रकार घडला.
निखिल शेंडकर (वय २७) आणि अंकिता निखिल शेंडकर (वय २६) असे आत्महत्या केलेल्या डॉक्टर पती पत्नीची नावे आहेत. वानवडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता ही बीएएमएच आहे. तर निखिल बीएएमएस आहे. काही दिवसांपूर्वीच या दोघांचेही लग्न झाले होते. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद नगर परिसरात ते राहत होते. बुधवारी रात्री काम आटोपल्यानंतर निखिल घरी येत असताना हे दोघेही पती-पत्नी फोनवर बोलत होते.फोनवर बोलत असताना त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे निखिल ने रागामध्ये फोन कट केला. रात्री निखिल घरी आल्यानंतर अंकिता गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याला दिसली. या सर्व प्रकाराने निराशेत गेलेल्या निखिल यानेही आज सकाळच्या सुमारास गळफास घेत स्वतःचे जीवन संपवले. स्थानिक नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी
पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून वानवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!