माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटे आणि त्याच्या टोळीवर मोक्का कारवाई, पत्नी देखिल अटक
पुणे;मागील अनेक महिन्यांपासून फरार असणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बराटे याच्या पत्नीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
संगीता रवींद्र बहाटे (वय ५५) असे अटक झालेल्या महिलेचे नाव आहे. याशिवाय काही दिवसांपूर्वी रवींद्र बहाटे याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या पितांबर दिवार याला देखील अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्यात रवींद्र बराटे याच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सहभाग असल्याच्या कारणावरून तसेच फरार असणाऱ्या रवींद्र बहाटे याच्याशी संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यामुळे संगीता बहाटे हिला अटक करण्यात आली आहे. रवींद्र बहाटे याने फरार असताना काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी पितांबर दिवार यांनी मदत केल्याचे समोर आल्यानंतर आज त्याला अटक करण्यात आली आहे.
तसेच रवींद्र बराटे आणि त्याच्या टोळीवर विविध पोलीस ठाण्यात १२ गुन्हे दाखल आहेत. महारुद्र चतुश्रृंगी, हडपसर, कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात बराटे टोळीवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. पहिला गुन्हा दाखल झाल्यापासून रवींद्र बराटे फरार आहे. न्यायालयाने त्याला फरार घोषित केल्यानंतर महसूल विभागाने त्याची मालमत्ता देखील जप्त केली आहे.
सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!