कत्तलीसाठी गाईंची वाहतूक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

भोसरी; कत्तलीसाठी चारचाकी वाहनातून गाईंची वाहतूक केल्या प्रकरणी चार ते पाच अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार देवकर वस्ती, चक्रपाणी वसाहतच्या मागे बुधवारी रात्री उघडकीस आला.

नीलेश विजय चासकर (वय ३२, रा.भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गावरान गाई व एक जर्सी गाय अशा तीन गाईंची आरोपींनी वाहतूक केली. देवकर वस्ती, चक्रपाणी वसाहतच्या मागे बुधवारी (दि.३०) रात्री एकच्या सुमारास सदर गायींची कत्तल करत असताना आरोपी आढळले असता, कारवाईसाठी आलेल्या पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपी त्यांच्याकडील चारचाकी वाहनात बसून फरार झाले. पोलिसांनी त्यांची गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र आरोपी वाहनातून भरधाव वेगात घेऊन निघून गेले.

पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.