शेअर मार्केट मधे गुंतवणूक करताय?मग हे नक्की बघा

नवी दिल्ली;चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत शेअर बाजाराने (Stock Market) गुंतवणूकदारांना चांगली कमाई मिळवून दिली आहे. एकीकडे संपूर्ण देश कोरोनाच्या लाटेशी झुंज देत होता. दुसरीकडे, गुंतवणूकदारांनी शेअर बाजारा मधुन मोठा नफा कमावला आहे. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे मार्च ते जून या कालावधीत गुंतवणूकदारांना २५,४६,९५४.७१ कोटी रुपयांचा नफा झाला आहे.

पहिल्या तिमाहीत BSE चा मुख्य निर्देशांक सेन्सेक्समध्ये जवळपास ६ टक्के वाढ झाली आहे. या काळात सेन्सेक्स निर्देशांकात २,९७३.५६ अंकांची वाढ झाली आहे. यावर्षी १५ जून रोजी BSE सेन्सेक्सची मार्केटकॅप २,३१,५८,३१६.९२ कोटी रुपयांवर गेली होती.

सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ३ ट्रिलियन डॉलर म्हणजेच २२० लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

याशिवाय BSE मध्ये समाविष्ट असलेल्या कंपन्यांची मार्केट कॅप आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ९०,८२,०५७.९५ कोटी रुपयांनी वाढून २,०४,३०,८१४.५४ कोटी रुपयांवर गेली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.