गैरसमजातून भावाने केले बहिणीच्या डोक्यात कुन्हाडीने वार,आरोपी गजाआड

पुणे; गैरसमजातून भावाने केले बहिणीच्या डोक्यात कुन्हाडीने वार. आई वडील फक्त बहिणीचेच लाड करतात, त्यामुळे आपल्याला घरात किंमत मिळत नाही. असा समज करून घेऊन आरोपीने झोपेत असणाऱ्या बहिणीच्या डोक्यात कुन्हाडीने वार केले. पुण्यातील हिंगणे खुर्द परिसरात बुधवारी सायंकाळच्या वेळी ही घटना घडली.

रोहन लक्ष्मण पारधे (वय १८) याने फिर्याद दिली असून,शंकर भीमराव हाटकर (वय ३०) हे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला अटक केली आहे. आरोपी हा फिर्यादीचा मामा आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार,मनीषा या हिंगणी खुर्द येथील साईनगरमध्ये राहतात. मनीषा या गरजेच्या वेळी आई वडिलांना मदत करतात. त्यामुळे आई-वडील फक्त तिचेच कौतुक करतात. त्यामुळेच आपल्याला घरात किंमत मिळत नाही अशी समजूत शंकर हटकर याची होती. याच समजुतीतून गुरुवारी सायंकाळच्या वेळी मनीषा या झोपेत असताना आरोपीने त्यांच्या डोक्यात कुन्हाडीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेत फिर्यादीची आई मनीषा या गंभीर जखमी झाल्या आहेत.

सिंहगड रस्ता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला अटकही केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.