सुनेचा अमानुषपणे शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या,पतीसह सासू सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल
हडपसर;हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळेपडळ परिसरात माहेरून पैसे आणण्यासाठी आणि मुलगी झाली तर घटस्फोट देईन अशी धमकी देत एका विवाहित महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरे आणि दिरा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पति प्रेमकुमार पंढरीनाथ गायकवाड त्याच्यासह सासू- सासरे आणि दीरा विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका २८ वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जून २०१९ पासून हा प्रकार सुरू होता. फिर्यादी महिलेचे पती सासू-सासरे आणि दीर तिला माहेरून पैसे आण्यास तगादा लाऊन शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते. तसेच मुलगी झाली तर घटस्फोट देईन अशी धमकी देखील त्यांनी पीडित महिलेला दिली होती. याशिवाय पतीने लैंगिक अत्याचार केल्याची ही तक्रार पीडित महिलेने दिली आहे.
हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!