कात्रज खिंडीत दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद,भारतीय विद्यापीठ पोलिसांची कामगिरी

पुणे; दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून मिरचीपूड, शस्त्र, दुचाकी असा ऐवज जप्त करण्यात आला.

अमित बापू ढावरे (वय १९, रा. सहकारनगर), विनय तुळजाराम येडके (२०, रा. कात्रज), ऋषिकेश राजू शिंदे (२३, रा. सहकानगर), गणेश आनंत कातवटे (२१, अरण्येश्वर सहकानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलीस अंमलदार शिवदत्त गायकवाड यांनी तक्रार नोंदवली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे पथक काल पहाटे हद्दीत गस्त घालत असताना, त्यावेळी नवले ब्रीजजवळील कात्रज खिंडीत चौघेजण संशयास्पदरित्या उभे असल्याचे पोलिसांनी पाहिले. त्यानुसार, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडे मिरची पूड, शस्त्रे आढळून आली.

परिसरातून जाणाऱ्या वाहनचालकांना अडवून जबरी चोरी आणि दरोडा टाकणार असल्याची कबुली आरोपींनी दिली.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. व्ही. डिगे तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.