‘पे ॲण्ड पार्क’ ची अंमलबजावणी?का सर्वसामान्य नागरीकांकडून खंडणी?,राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलनं

पिंपरी-चिंचवड; पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कोरोनाच्या काळात गोरगरीब नागरीकांना, कामगारांना आर्थिक मदत देणे आवश्यक असताना ‘पेॲण्ड पार्क’ ची अंमलबजावणी करणे म्हणजे सर्वसामान्य नागरीकांकडून खंडणी वसूलीचाच प्रकार असल्याचा आरोप करत पे अॅण्ड पार्क राष्ट्रवादी काँग्रेसने आज (शुक्रवारी) महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलनं केले.

भाजपाच्या दबावाखाली येऊन प्रशासनाने शहरातील तेरा मुख्य रस्ते, उड्डाणपुलांच्या खालील जागा अश्या एकूण ४५० ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांना एक जुलै पासून ‘पे अॅण्ड पार्क’ लागू केल्याचा आरोपही त्यांनी केला. याचा निषेध करण्यासाठी आणि ‘पे अॅण्ड पार्क’ चा निर्णय मागे घ्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिका भवनासमोर निदर्शने केली.

शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, विक्रांत लांडे, मयूर कलाटे, नगरसेविका सुलक्षणा धर, प्रज्ञा खानोलकर, निकीता कदम, युवक प्रदेश पदाधिकारी विशाल काळभोर, लाला चिंचवडे, योगेश गवळी, कुणाल थोपटे, शेखर पाटील, किरण देशमुख, माधव पाटील तसेच कविता खराडे, संगिता पवार,शाम जगताप, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप आदींसह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मनपातील भाजपाच्या सत्तेविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

शहरातील युवकांच्या हाताला काम नाही. उद्योजक, व्यापारी सर्वच आर्थिक अडचणीत आहेत. नागरिकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. अशा वेळी हवालदिल झालेल्या कष्टकरी, गोरगरीब कामगारांना, सर्वसामान्य नागरीकांना मदतीचा हात देऊन दिलासा देणे अपेक्षित होते.केंद्र सरकारने मागील सहा वर्षात जीएसटी, नोटाबंदी असे तुघलकी निर्णय घेतले. त्यामुळे सर्वच उद्योग, व्यवसायांवर आर्थिक संकट आले आहे. त्यात मार्च २०२० पासून कोरोनाच्या महामारीमुळे, लॉकडाऊनमुळे लाखो नागरीकांचा रोजगार गेला आहे. मदत करण्याऐवजी पिंपरी चिंचवड मधील भाजपच्या भ्रष्टाचारी प्रशासनाने सर्व सामान्यांच्या खिश्यावर डल्ला मारला आहे. पेॲण्ड पार्कचा आदेश ताबडतोब प्रशासनाने मागे घ्यावा, असे युवक अध्यक्ष वाकडकर यांनी म्हंटले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.