घृणास्पद!अल्पवयीन मुलीवर २ वर्षापासून बलात्कार करणाऱ्या ५ आरोपीवरुद्ध गुन्हा दाखल

पुणे;१४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पाच जणांच्या टोळक्याने तिच्यावर तब्बल दोन वर्षे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरात ही घटना घडली.

पीडित मुलीने केलेल्या तक्रारीनंतर आळेफाटा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२०१९ आली १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची एका आरोपीसोबत ओळख झाली होती.याच ओळखीचा फायदा घेऊन त्याने तिच्या सोबत अश्लील फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन पाच मित्रांनी जून २०१९ ते १५ जून २०२१ या कालावधीत वेगवेगळ्या गाड्यांमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पुढील तपास आळेफाटा पोलिस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.