जीम ट्रेनरनेच केले महिलेसोबत अश्लील वर्तन, आरोपीवरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

पुणे; जीम ट्रेनरनेच एका महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार एनआयबीएम येथे घडला. याप्रकरणी जीम ट्रेनरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश हनुमंत सूर्यवंशी (वय २९, रा. वानवडी) गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. एका २८ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयबीएम रस्त्यावरील जी.जे. फिटनेस जीम येथे २५ जूनला रात्री सव्वा आठच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी महिला गेल्या दोन महिन्यांपासून या जीममध्ये व्यायामासाठी जात होत्या. आरोपी गणेश तेथे ट्रेनर म्हणून काम करतो. २५ जूनच्या दिवशी व्यायाम केल्यानंतर स्ट्रेचिंग देण्याच्या बहाण्याने आरोपीने महिलेसोबत अश्लील वर्तन केले. दरम्यान, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरात निर्बंध घातले आहेत. त्यानुसार अत्यावश्यक सेवा आणि दुकाने वगळता सर्व आस्थापना दुपारी चारपर्यंतच खुल्या ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही जीम रात्री सव्वाआठ वाजता सुरू होती, या विनयभंगाच्या प्रकरणावरून उघड झाले आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.