कर्ज फेडले नाही म्हणून एकाला बेदम मारहाण,श्री एंटरप्राइजेस रिकवरी एजन्सीच्या मालकासह तिघांवर गुन्हा दाखल

स्वारगेट;फायनान्स कंपनीची कर्ज वसुली करणाऱ्या एजन्सीच्या काही कर्मचाऱ्यांनी एका व्यक्तीला खोलीत डांबून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वारगेट परिसरात हा प्रकार घडला असून कर्ज वसूल करणाऱ्या एजन्सीच्या पदाधिकारी विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडीती व्यक्तीने तक्रार दिली आहे.

श्री एंटरप्राइजेस रिकवरी एजन्सीचे मालक आणि तीन साथीदारांन विरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांनी एका फायनान्स कंपनी कडून कर्ज घेतले होते.आरोपी हे या कंपनीचे कर्ज वसुलीचे काम करत असताना, आरोपींनी फिर्यादी कडून खर्च वसूल करण्यासाठी त्यांना बराच काळ डांबून ठेवले होते. तसेच कर्जाचे पैसे दिले नाही तर हात-पाय तोडण्याची धमकी देखील दिली होती. फिर्यादी हे या रिकवरी एजन्सीच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना आरोपींनी धक्काबुक्की करत फिर्यादीस मारहाण केली. त्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार केली.दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास स्वारगेट पोलीस करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.