कात्रज घाटात सापडला व्यावसायिकाचा मृतदेह, आर्थिक चणचणी मुळे अडचणीत असल्याची माहिती

पिंपरी चिंचवड; पिंपरी चिंचवड परिसरातील एका व्यावसायिकाचा कात्रज घाटात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आनंद गुजर (वय ४३) असे मृतदेह आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज सकाळच्या सुमारास या मृतदेहा बाबतची माहिती पोलिसांना मिळाली असता, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे.

आनंद गुजर हे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार, आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास कात्रज घाटात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून हा मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला आहे. मयत आनंद गुजर हे पिंपरी-चिंचवड येथील आकुर्डी परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली आहे.गुजर यांचा पिंपरी-चिंचवड परिसरात व्यवसाय होता. परंतु मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन असल्यामुळे ते अडचणीत असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले आहे.

आनंद गुजर यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असे भारती विद्यापीठ पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

पुढील तपास भारती विद्यापीठ पोलिस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.