उद्योजक गणेश गायकवाड विरोधात चौथा गुन्हा दाखल,चक्क बनावट खरेदी खत तयार केले

औंध;पुण्याच्या औंध परिसरातील विविध राजकीय व्यक्तींशी संबंध असलेले गणेश नानासाहेब गायकवाड आणि त्यांच्या तीन साथीदारांनी विरोधात पुण्यातील चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दस्तऐवज तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश नाना गायकवाड, विलास थानमल पालरेषा, सोनाली दीपक गवारे, दीपक गवारे आणि चिमनलाल मिठालाल ओसवाल आणि इतरांवर गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी प्रितम प्रताप खांदवे (वय ३९) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लोहगाव परिसरातील खांदवे वस्ती या ठिकाणी राहतात.याच परिसरात त्यांची प्लॉटिंग आहे. रस्त्याच्याकडेला देखील त्यांचे काही प्लॉट आहेत. आरोपींनी आतील भागामध्ये प्लॉट खरेदी केला होता.आरोपींनी संगणमत करून खरेदी दस्तमध्ये चुकीची माहिती टाकून बनावट खरेदी खत तयार केले आणि फिर्यादी यांची फसवणूक केली. चंदन नगर पोलिस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल कर्नाटक आला आहे.

गणेश गायकवाड यांच्या विरोधात हा चौथा गुन्हा दाखल आहे. या पूर्वी त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा चतुःशृंगी आणि हिंजवडी पोलिस ठाण्यात दाखल आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.