धक्कादायक! ३वर्षीय मुलीवर अल्पवयीन मुलाकडून लैंगिक आत्याचार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
तळेगाव;खेळण्याच्या बहाण्याने सोसायटीच्या गार्डन मध्ये घेऊन जात तीन वर्षीय मुलींवर अल्पवयीन मुलाने लैंगिक आत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. १ जुलै रोजी तळेगाव दाभाडे परिसरात हा प्रकार घडला. याप्रकरणी आरोपीवर भारतीय दंड विधान कलम ३७६ व पोस्को अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन वर्षीय मुलीच्या आईने आज (शनिवारी) याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादी महिलेचा भाचा आहे. आरोपी फिर्यादी यांच्या तीन वर्षीय मुलीला व पुतणी यांना खेळण्याच्या बहाण्याने सोसायटीच्या गार्डन मध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी आरोपीने तीन वर्षीय मुलींवर लैंगिक आत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळी करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!