एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’,असे म्हणत २४ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे;महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परिक्षेत उत्तीर्ण होऊनही अद्याप नोकरी नसल्याच्या तणावातून व आर्थिक परिस्थितीतून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

स्वप्नील सुनिल लोणकर (वय २४, रा. गंगानगर, फुरसुंगी) असे आत्महत्या करणार्‍या तरुणाचे नाव आहे. स्वप्निलने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहिली असून त्यात ‘एमपीएससी मायाजाल आहे, यात पडू नका’ असे म्हटले आहे.

येणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत फक्त वय आणि ओझं वाढत जात. Confidense तळाला पोहचतो आणि self doubt वाढत जातो. दोन वर्षे झालेत पास होऊन आणि वय २४ संपत आल आहे. घरची एकंदरीत परिस्थिती,परीक्षा निघणार या आशेवर घेतलेल कर्ज खासगी नोकरी करुन कधीही फिटू न शकणारा कर्जाचा डोंगर घरच्यांच्या आणि इतर सर्वांच्या वाढत्या अपेक्षा आणि माझी मी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी कमी पडतोय ही भावना. कोरोना नसता सर्व परीक्षा सुरळीत झाल्या असत्या. तर आज आयुष्य खूप वेगळं आणि चांगलं असत.”मी घाबरलो, मी खचलो अस मुळीच नाही. मी फक्त कमी पडलोय, माझ्याकडे वेळ नव्हता. नकारात्मकतेची वादळ ही कित्येक दिवस मनात होती. पण काही तरी चांगलं होईल या आशेवर तग धरला होता. पण आता इथून पुढे आयुष्य कॅन्टीन्यू होऊ शकेल अस काही उरलेल नाही. याला कोणतीही व्यक्ती कारणीभूत नसून हा माझा सर्वस्वी निर्णय आहे. मला माफ करा… १०० जीव वाचवायचे होते. पण डोनेशन करून ७२ राहिले. जमलं तर इतरांपर्यंत पोहचवा. अनेक जीव वाचतील.

स्वप्नीलचे वडिल सुनील लोणकर यांचा शनिवार पेठेत बिल बुक बांडिंगचा छोटा प्रिटिंग प्रेसचा व्यवसाय आहे. ते व त्यांची पत्नी असे दोघे हा व्यवसाय पाहतात. स्वप्नील स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे. स्वप्नीलचे आईवडिल हे नेहमीप्रमाणे बुधवारी (३० जून) सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांची मुलगी दुपारी साडे चार वाजता घरी आली. तेव्हा स्वप्नीलने त्याच्या खोलीमध्ये गळफास घेतल्याचे तिच्या निदर्शनास आले. तिने हा प्रकार आई वडिलांना कळविला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यु झाल्याचे सांगितले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.