अल्पवयीन मुलांवर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल,गुंडा विरोधी पथकाची कामगिरी

पिंपरी चिंचवड;बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांवर भारतीय हत्यार कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. ३) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास गुंडा विरोधी पथकाने विकासनगर रोडवर ही कारवाई केली.

गुंडा विरोधी पथकातील पोलीस शिपाई शुभम कदम यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन अल्पवयीन मुलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एम बी कॅम्प देहूरोड येथील विकासनगर रोडवर दोन अल्पवयीन मुले शस्त्र घेऊन थांबली आहेत. अशी माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी दुपारी साडेचार वाजता परिसरात सापळा रचून कारवाई केली. त्यामध्ये दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यातील एकाकडून लोखंडी कोयता आणि दुसऱ्या मुलाकडून मोठा रॅम्बो चाकू चामडी कव्हरसह जप्त करण्यात आला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.