व्हाट्सअपवर द्वारे महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न पडला महागात,आरोपी अटक
देहूरोड; महिलेच्या आणि मुलाच्या व्हाट्सअपवर मेसेज पाठवून महिलेशी जवळीक साधण्याचा एका व्यक्तीने प्रयत्न केला.याबाबत त्याला समजावून सांगितले असता त्याने महिलेच्या मुलाला फोनवर शिवीगाळ केली. याबाबत गुन्हा दाखल करून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.
विष्णू धोंडीराम बिराजदार (वय ३०, रा. नांदेडसिटी, ता. हवेली, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात शनिवारी (दि.३) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ४ मोबाइल क्रमांकावरून फिर्यादी महिलेच्या व्हाट्सअपवर तसेच त्यांच्या मुलाच्या व्हाट्सअपवर मेसेज पाठवले. याबाबत फिर्यादी यांच्या मुलाने आरोपीला फोन करून समजावून सांगितले. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या मुलाला शिवीगाळ करून धमकी दिली.जबरदस्तीने आरोपी फिर्यादी यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पुढील तपास देहूरोड पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!