विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!इंग्रजी शाळांची फी २५ टक्के कमी,कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुलांना मोफत शिक्षण

कोरोनाच्या महामारी मुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) या संघटनेने इंग्रजी शाळांच्या शुल्कामध्ये २५ टक्के कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचाही निर्णय या संघटनेने जाहीर केला आहे. राज्यातील एकूण इंग्रजी शाळांपैकी ८० टक्के शाळा या संघटनेशी संलग्न आहेत. या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. मुंबई, रायगड आणि ठाणे विभागात या संघटनेशी संबंधित १२००० इंग्रजी शाळा आहेत.


गेल्या सव्वा वर्षापासून कोरोना सुरू असल्याने या काळात नोकरी आणि व्यवसायावर विपरित परिणाम झाल्याने नागरिकांची आर्थिक परिस्थिती खालावली आहे. परिस्थिती लक्षात घेऊन शाळांनी शुल्क कमी करावे, अशी मागणी सातत्याने पालक संघटनांकडून होत असताना,त्याची दखल घेत महाराष्ट्रात १८ हजार सभासद असलेल्या मेस्टाची नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

अर्थात हा निर्णय घेतानाही शाळांनी आपल्या अडचणी मांडल्या आहेत. कोरोनामुळे पालकांबरोबरच इंग्रजी शाळाही अडचणीत सापडल्या आहेत. वीजबील आणि अन्य पायाभूत सुविधांसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते थकले आहेत. त्यामुळे बँका इमारती जप्त करत आहेत. ही बाब लक्षात घेण्याची गरज आहे. काही उपद्रवी राजकारणी लोक पालकांना पुढे करून इंग्रजी शाळांना लक्ष्य करीत आहेत. शाळेत गोंधळ घालून शाळांना ब्लॅकमेल करण्यात येत आहे हे दुर्दैवी आहे, असे मत संघटनेच्या सदस्यांनी मांडले. ज्या पालंकाचे उद्योग व्यवसाय सुरळीत चालू आहेत, जे सरकारी अथवा निमसरकारी नोकरीला आहेत त्यांचा पगार होत आहे त्या पालकांनी शाळांची फी भरायला हवी ते पालकही वेट अँड वॉच ची भूमिका घेऊन फी भरण्यासाठी नकार देत आहेत. या बाबीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी या बैठकीत शाळांनी केली. पालकांची अडचण तसेच सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन मेस्टाने शालेय शुल्कामध्ये २५ टक्के शुल्क कमी करण्याचा व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या पालकांच्या पाल्यांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय संघटनेच्या वतीने घेण्यात आल्याचेही यावेळी स्पष्ट केले.

संस्थाचालकांची प्रतिक्रिया:

सरकार आरटीई प्रवेशाचा थकीत फी परतावा गेल्या तीन वर्षांपासून दिला जात नाही. कोट्यवधी रक्कम ही सरकारकडे पडून आहे. ती फी मिळत नाही. तर दुसरीकडे पालक फी भरत नाहीत, असा मुद्दा यावेळी मांडण्यात आला.

[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

आम्हाला लाईट बिल भरावेच लागते, कर्जाचे हप्ते भरावेच लागतात, ऑनलाईन शिकवणारे शिक्षकांचे पगार करावेच लागतात, यासाठी शाळांनाही रक्कम लागते. फी दिली जात नाही, मग शाळा बंद पडल्या तर याला जबाबदार कोण? सरकार, फी बुडवणारे पालक, असा सवालही संस्थाचालकांनी आक्रमकपणे केला.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.