आत्महत्या केलेल्या स्वप्नील च्या आईची कळकळ,सगळं सरकार आंधळ असा आरोपe

पुणे; पुण्याच्या स्वप्निल लोणकरनं आत्महत्या केलीय.तो एमपीएससीच्या पहिल्या दोन्ही परीक्षा पास झालेला होता. आणि मुलाखतीसाठी दोन वर्ष वाट पहात होता. एकीकडे वाट पहाण्याची सजा आणि दुसरीकडे कुटुंब आर्थिक विवंचनेत अशा दुहेरी संकटात तो सापडला आणि त्यातच त्यानं आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. त्यानंतर स्वप्निलच्या आईनं मात्र सरकारला कटघऱ्यात उभा करत, माझ्या स्वप्निलसारखे कित्येक स्वप्निल अशाच अवस्थेत आहेत, त्यांना वाचवा अशी आर्त विनवणी सरकारला केलीय.

कुटुंबात आई, वडील, बहिण आहे. लॉकडाऊनमध्ये धंदा बसलाय. डोक्यावर कर्जही आहे. हातावर पोट असलेलं कुटुंब आहे. पण अशाही स्थितीत आणखी कोणत्या स्वप्निलचा बळी जाऊ नये म्हणून ते प्रयत्न करतायत. एमपीएससीचा कारभार, सरकारची त्याबद्दलची उदासिनता याबद्दल स्वप्निलच्या कुटुंबियांच्या मनात राग आहे. स्वप्निलच्या आई म्हणाल्या, सगळं सरकार आंधळंय, भाजप सरकार आंधळंय, मोदी सरकार आंधळंय, आघाडी सरकार आंधळंय, सगळं सरकार आंधळंय.

स्वप्निलच्या आईचे अश्रू थांबत नव्हते. तशाही अवस्थेत त्या म्हणाल्या मला सगळ्या सरकारला दोष द्यायचाय. ते फक्त त्यांचं स्वत:चं बघतात. सरकारला नाही जाग येत. अशी कित्ती कित्ती मुलंयत. गरीब कुटुंबातलीच मुलं पहातात हो ही स्वप्न. मोठ्यांना नाही गरज लागत. मंत्र्यांच्या मुलांना नाही गरज लागत अशा स्वप्नांची. त्यांना आपोआप सगळं मिळतं हो. गरीबांचीच मुलं इथपर्यंत पोहोचतात कष्ट करुन.

गडकरींच्या हस्ते सत्कार, अजित पवारां सोबत बैठक

स्वप्निल लोणकर हा हुशार होता. कोरोनाच्या काळातही तो सामाजिक कार्यात सक्रिय होता. स्वप्निलच्या आईंनी सांगितलं की- त्याला दिल्लीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते पारितोषीक मिळालं होतं. तो पोलीस मित्राचं काम करत होता. त्यानं एक नाही दोन नाही तर प्लेट लेट डोनेशन सत्तावीस वेळेस केलेलं होतं. त्याला शंभर जणांचे जीव वाचवायचे होते. कोरोनाग्रस्तांना प्लाज्मा डोनेशन मिळावं म्हणून तो रात्र रात्र जागं असायचा. महाराष्ट्राबाहेर त्याचे फोन व्हायचे. मी त्याला म्हणायचे, अरे स्वप्निल तुला भाजीपाल्यागत प्लाज्मा मागत्यात लोकं, त्यानं, त्याच्या मित्रानं इंजेक्शन उपलब्ध केले. ऑक्सिजन केलं. इथं जी अमोल कोल्हे, अजित पवार यांची बैठक झाली होती, तिसऱ्या लाटेसाठीची. तिच्यातही तो होता. त्याच्यात चर्चा झाली की आपण हे कसं रोखू शकतो. लहान मुलांना कसा त्रास नको. इथपर्यंत तो मुलगा हुशार होता. पण एवढ्या एका कारणामुळे तो एवढं टोकाचं पाऊल उचलेल याची कल्पना कोणीच केली नव्हती.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.