घरफोडीत ४८ तोळे सोने चोरले, चोरट्यावरुद्ध गुन्हा दाखल

दिघी;दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी सात लाख २२ हजार ५०० रुपयांचे ४८ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना दिघी रोड, भोसरी येथे शनिवारी (दि. ३) सायंकाळी उघडकीस आली.

दीपक रमेश ओसवाल (वय ३८, रा. सँडविक कॉलनी, दिघी रोड, भोसरी) यांनी रविवारी (दि.४) याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ओसवाल यांचे घर १ जुलै रोजी सायंकाळी सहा ते शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान कुलूप लावून बंद होते. दरम्यान चोरट्याने त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी उचकटला. चोरट्यांनी घरात प्रवेश करून लाकडी कपाटाचे कुलूप तोडून आतील ४८२ ग्रॅम वजनाचे सात लाख २२ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.