धक्कादायक!वाकडमध्ये महिला पोलिसाची गळफास आत्महत्या

वाकड;वाकडमध्ये एका पोलीस कर्मचारी महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (सोमवारी, दि. ५) घडली.

श्रद्धा शिवाजीराव जायभाय (वय २८, रा. कावेरीनगर पोलीस वसाहत, वाकड) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कर्मचारी महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा जायभाय या पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होत्या. २०१२ साली त्या पोलीस दलात दाखल झाल्या. त्यांची पुणे पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेत नियुक्ती होती.


त्या वाकडमधील पोलीस वसाहतीत राहत होत्या. रविवारी रात्री त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, श्रद्धा यांची सोमवारी साप्ताहिक सुट्टी होती. त्यांना चार वर्षांची मुलगी आहे. रविवारी रात्री त्यांनी त्यांच्या मुलीला नातेवाईकांकडे सोडले. राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन त्यांनी सामहत्या केली. त्यांचा मोबाईल फोन लागत नसल्याने त्यांच्या एका मैत्रिणीने वाकड पोलिसांना माहिती दिली.

वाकड पोलिसांनी घरी जाऊन पाहणी केली असता त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. दरवाजा तोडून बघितले असता श्रद्धा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. श्रद्धा जायभाय यांचे पती भारतीय नौदलात आहेत. त्यांची सध्या केरळ येथे पोस्टिंग आहे. श्रद्धा यांच्या आत्महत्येचे नेमके कारण सजू शकले नाही.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.