भाजपच्या आंदोलनाला यश!

वाघोली;वाघोली ते शिक्रापूर नगर रोडचे काम चालू असताना नवीन रस्त्याची व जुन्या रस्ता दुभाजकाची उंची एकसारखी झाल्यामुळे अनेक वाहनचालक कुठूनही कुठलाही विचार न करता युटर्न मारत आहेत व त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

काम अपूर्ण असल्यामुळे खूप मोठा अपघात होण्याची शक्यता आहे व त्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर रस्ता दुभाजकाचे काम पूर्ण करण्याची मागणी श्री गणेश सातव उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा तसेच श्री विजय जाचक अध्यक्ष भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडीच्या वतीने केली होती व काम लवकरात लवकर पुर्ण न केल्यास भारतीय जनता पार्टी तर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.

सदर निवेदनाची दखल घेत दुभाजकाचे काम त्वरित चालू केल्याबद्दल संबंधित श्री. मिलिंदजी बारभाई, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग व कॉन्ट्रॅक्टर यांचे नागरिकांकडून आभार.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.