तृतीयपंथीयाकडून भाजीविक्रेत्या महिलेला कपडे फाडून मारहाण,आरोपीविरोधात गुन्हा दाखल

उत्तमनगर;तृतीयपंथीयाने एका महिलेला मारहाण करून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून मारहाण केली. त्या वेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजीविक्रेत्या महिलेचे कपडे फाडून त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.

याप्रकरणी चाळीस वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तृतीयपंथी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे उत्तमनगर भाजी मंडई येथे भाजी विक्रीचे दुकान आहे. शनिवारी सकाळी सातच्या सुमारास एका तृतीयपंथी इसमाने भाजी विक्री दुकानासमोर बसलेल्या महिलेकडून पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. त्याशिवाय त्यांना मारहाणही केली. त्यामुळे त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न तक्रारदार यांनी केला. याचा राग तृतीयपंथीला आला. त्यामुळे तृतीयपंथीने मध्यस्थी करणाऱ्या महिलेचे कपडे फाडून त्यांना मारहाण केली. त्यांच्याकडील २५० रुपये घेऊन मारहाण केली.

पुढील तपास उत्तमनगर पोलीस करत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.