पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी!१२ जुलैपासून होणार दुसऱ्या सत्रातील परीक्षा,पहा नियमावली

पुणे;सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्या दुसऱ्या सत्रातील परीक्षांना १२ जुलैपासून सुरुवात होत असून या परीक्षेसाठी आतापर्यंत साधारण ६ लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. बहुपर्यायी पध्दतीने ही ऑनलाईन परीक्षा होणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाकडून पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, प्रमाणपत्र व इतर अशा एकूण २८४ अभ्यासक्रमांसाठी ४ हजार १९५ विषयांसाठी ही ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. मुख्य परिक्षेआधी याही सत्रात ८ ते १० जुलैदरम्यान विद्यार्थ्यांची सराव परीक्षा (मॉक टेस्ट) घेण्यात येणार आहे. या सर्व परीक्षेत विदयार्थ्यांना सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारण्यात येतील.

मुख्य परीक्षा १२ जुलैपासून सुरू होणार असून परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षा प्रॉक्टर्ड पध्दतीने घेण्यात येणार असून ६० प्रश्नांची ऑनलाईन परीक्षा असणार आहे. यातील ५० प्रश्नांची उत्तरे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. विज्ञान व अभियांत्रिकी विद्याशाखेतील गणित व संख्याशास्त्र या विषयांसाठी एकूण ३० प्रश्न विचारले जाणार असून त्यातील २५ प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.