चक्क गर्भपाताची औषधे ऑनलाईन विक्री,ऑनलाईन विक्री केल्याप्रकरणी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

वाकड;गर्भपाताची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय बेकायदेशीरपणे ऑनलाईन माध्यमातून विक्री केल्याप्रकरणी गुजरात येथील एका कंपनी पालकाच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिंटू कुमार प्रवीणचंद्र शहा हे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

औषध निरीक्षक भाग्यश्री अभिराम यादव यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी आर के मेडिसिन्स,A/61 परिसीमा कम्प्लीट कॉलेज रोड नव्रंगपुरा अहमदाबाद गुजरात ३८०००६ याचे चालक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्भपाताची औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय दिली जात नाहीत. तरीदेखील बेकायदेशीरपणे आरोपीने ही औषधे ऑनलाइन माध्यमातून विकली. विवेक मल्हारी तापकीर यांनी ॲमेझॉन या ऑनलाइन पोर्टलद्वारे गर्भपाताची औषधे ३१ मे रोजी मागवली. त्यांना आरोपीच्या कंपनीची औषधे ४ जून रोजी मिळाली. त्यानंतर तापकीर यांनी याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे पुण्याचे सहआयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्याबाबत फिर्यादी अन्न निरीक्षक आणि अन्न निरीक्षक विवेक खेडकर यांनी गुजरात येथे जाऊन या प्रकरणाची चौकशी केली असता आरोपी दोषी आढळला. त्यानुसार याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्हा अंतर्गत भारतीय दंड विधान कलम 120 (ब) तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत 18 (vi), 18 (c) read withrule 65 (3) (1), 65 (4) (4), 65 (6), 65 (9) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.