किरकोळ वादातून महिलेचा केला विनयभंग,दोन आरोपींवर गुन्हा दाखल

निगडी;महिलेने तंबाखू दिली नाही या कारणावरून दोघांनी तिला शिवीगाळ आणि मारहाण केली. तसेच तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना लहुजी वस्ताद डपट्टी, प्राधिकरण निगडी येथे घडली.

बाळू मुजमुले (वय ६०), दीपक मुजमुले (वय २२, दोघे रा. लहुजी वस्ताद झोपडपट्टी, प्राधिकरण निगडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास त्यांच्या घरासमोर तंबाखू चोळत उभ्या होत्या. त्यावेळी आरोपी दीपक हा दारू पिऊन आला. त्याने फिर्यादी यांच्याकडे तंबाखू मागितली. मात्र फिर्यादी यांनी त्यास तंबाखू देण्यास नकार दिला. या कारणावरून त्याने फिर्यादी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी बाळू तिथे आला. त्याने दीपकच्या कानाखाली मारल्या. तरीही दीपक फिर्यादी यांना शिव्या देत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी देखील दीपकला शिवीगाळ केली. त्यावरून आरोपी बाळू याने फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला.

पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.