पुण्यात तीन ठिकाणी भीषण अपघात,विश्रांतवाडी, हडपसर आणि वानवडी,अपघातात तिघांचा मृत्यू

पुणे;पुण्यातील वानवडी, विश्रांतवाडी आणि हडपसर परिसरात झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला. विश्रांतवाडी परिसरातील धानोरी पोलीस चौकी समोर १३ जून रोजी माधाव वेगातील दुचाकीने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ला धडक दिली होती.

यामध्ये दिलीप राजू लष्करे (रा. मुंजाबा वस्ती धानोरी) हे गंभीर जखमी झाले होते. तोंडाला कपाळावर आणि डोक्याला मार लागल्याने गंभीर अवस्थेत त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंमादेवी चौक पेट्रोल पंपाजवळ अज्ञात रिक्षाचालकाने सायकल वरुन जाणाऱ्या एका व्यक्तीला जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या प्रकाश हरिभाऊ करंडे (वय ७१, केदारी नगर गल्ली वानवडी) त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात रिक्षाचालक या विरोधात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सासवड रस्त्यावर झालेल्या अपघातात बाळासाहेब मच्छिंद्र सोनार (वय ५२) यांचा मृत्यू झाला आहे. बाळासाहेब सोनार हे पत्नीसह दुचाकीने जात होते. त्यावेळी दुसऱ्या कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात असणारी एक कार बाळासाहेब सोनार यांच्या दुचाकी वर येऊन धडकली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने बाळासाहेब यांचा मृत्यू झाला तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. हडपसर पोलिस ठाण्यात याप्रकरणी स्विफ्ट कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.