सिनेसृष्टीवर शोककळा!बॉलिवूडचे ज्येष्ठ सदाबहार अभिनेते दिलीप कुमार पडद्या आड

बॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. बॉलिवूडचे ज्येष्ठ सदाबहार अभिनेते दिलीप कुमार यांचे बुधवारी (७ जुलै) वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले आहे. प्रदिर्घ आजाराने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मागील अनक वर्षांपासून दिलीप कुमार यांची तब्येत खालावलेली होती. त्यांच्यावर सातत्याने उपचार करण्यात येत होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मालावली आहे. अभिनेता दिलीप कुमार यांच्यावर मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरु होते, तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दिलीप कुमार यांनी १९४०-७० अशी जवळपास तब्बल तीन दशकं त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर गाजवली. १९४४ मध्ये आलेल्या ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयास सुरुवात केली होती. मात्र हा चित्रपट अपयशी ठरला होता. त्यानंतर आलेला ‘मिलन’ हा त्यांचा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आणि त्यानंतर त्यांनी कधीचं मागे वळून पहिलं नाही.

आज भारतीय सिनेसृष्टीतील अनेक नामांकित कलाकार यांना आपला आदर्श मानतात. इतका लोकप्रिय असलेला हा अभिनेत्याने वयाच्या ९८ व्या वर्षापर्यंत आजाराशी लढा दिला.त्यांना बॉलिवूडमधील ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ओळखलं जायचे. वयोमानामुळं गेल्या काही काळात अनेकदा त्यांची तब्येत बिघडली होती. शिवाय दिलीप कुमार यांचे भाऊ असलम आणि एहसान खान यांचे गेल्या वर्षी करोनाच्या संक्रमणाने निधन झाले होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.