दुचाकींची चोरी करणारे सराईत जेरबंद,२ लाख २० हजार रूपये किंमतीच्या ७ दुचाकी हस्तगत,लोणी काळभोर गुन्हे शोध पथकाची कामगिरी

लोणी काळभोर;लोणी काळभोर गुन्हे शोध पथकाने पुणे शहर, पिंपरी चिंचवड व लोणी काळभोर परिसरात दुचाकीची चोरी करणाऱ्या दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांंना जेरबंद केले आहे.

याप्रकरणी महादेव पोपट पांगारकर ( वय २६, रा. पांगारकर वस्ती, सहजपुर, ता. दौंड ) व त्याचा मित्र राहुल सुरेश भिलारे ( रा. जावजीबुवाची वाडी ता.दौंड ) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ३ ) रोजी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथक गस्त घालत असताना पोलीस हवालदार शैलेश कुदळे व बाजीराव विर यांना महादेव पांगारकर हा चोरीची ऍक्टिव्हा मोटार सायकल घेवुन लोणी काळभोर गाव परिसरात फिरत आहे अशी माहिती मिळाली. त्यानंतर पांगारकर यांनी शिताफीने पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडील मोटार सायकल ही उरूळी देवाची ( ता हवेली ) येथुन चोरी केल्याचे सांगितले. पांगारकर यांने त्याचा मित्र राहुल भिलारेच्या मदतीने पिंपरी चिंचवड, चिखली, वाकड, भिगवण, खेड, लोणी काळभोर परिसरातुन दुुचाकी चोरल्याचे सांगितले. भिलारे यालाही सापळा रचुन अटक करण्यात आली. त्याच्याकडून २ लाख २० हजार रुपये किमतीच्या ७ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे.

पिंपरी-चिंचवड तसेच पुणे ग्रामीण जिल्हयातील लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे हद्दीतील २ तर खेड, भिगवण, चंदननगर, वाकड, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी १ गुन्हा उघडकीस आला आहे. तसेच महादेव पांगारकर व राहुल भिलारे हे सध्या यवत पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात फरार असलेले आरोपी आहेत.

सदरची कामगिरी,पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त परिमंडळ ५ च्या नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक ( गुन्हे ) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजु महानोर, पोलीस हवालदार नितीन गायकवाड, अमित साळुंंके, श्रीनाथ जाधव, सुनिल नागलोत, अक्षय कटके, प्रशांत सुतार, शैलेश कुदळे, बाजीराव वीर, निखील पवार, दिगंबर साळुंके यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.