उधार पैसे वसुलीसाठी चक्क कर्जदाराच्या मित्रांचे अपहरण,दोन आरोपी गजाआड

पुणे; उधार घेतलेल्या पैशाच्या वसुलीसाठी पैसे येणाऱ्या व्यक्तींच्या मित्रांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक केली आहे.

अविनाश पांडुरंग पाटील (वय ३१) आणि उत्तम तुरूंम्बकर (वय ३१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी निखील उदय गुरव (वय २६) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा मित्र असलेल्या संदीप पाटील याने आरोपीकडून उधार पैसे घेतले होते. हे पैसे तो परत देत नव्हता आणि समोरही येत नव्हता. त्यामुळे आरोपींनी कोल्हापूरहून पुण्यात येत न-हे परिसरात राहणारे फिर्यादीचे मित्र प्रभात तोडकर आणि अजित राऊत यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना वाकड परिसरातील एका फ्लॅटमध्ये कोंडून ठेवत मारहाण केली आणि संदीप पाटील याला या ठिकाणी बोलावून घेण्याची मागणी केली. आरोपींनी यासंबंधी फिर्यादीला फोन करून संदीप पाटील याला घेऊन ये अन्यथा पैसे दे असे सांगितले होते. या सर्व प्रकारानंतर फिर्यादीने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली. सिंहगड पोलिसांनी तपासाला सुरुवात करत काही वेळातच आरोपींना अटक केली.

पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.