गुगल कंपनीत नोकरी लावण्याचं आमिष दाखवून तरुणाला २.५० लाखाला घातला गंडा, आरोपीवरुद्ध गुन्हा दाखल
वाकड; गुगल कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाचा आणि त्याच्या वडिलांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर नोकरी लावण्यासाठी २ लाख ४३ हजार रुपये घेतले. पैसे घेऊन तरुणाला नोकरी न लावता त्यांची फसवणूक केली. ही घटना एक काळेवाडी येथे घडली.
प्रग्नेश महेशभाई लिंबासीया (वय ३०, रा. काळेवाडी) यांनी याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रिन्स रोनक वेनीलाल कोटेचा (रा. डांगे चौक,वाकड) गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने फिर्यादी यांना गुगल कंपनीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. त्याबाबत फिर्यादी आणि त्यांच्या वडिलांचा आरोपीने विश्वास संपादन केला. आरोपीने वेळोवेळी २ लाख ४३ हजार २११ रुपये घेतले. आणि नंतर नोकरी लावण्यास टाळाटाळ करून पैसे घेऊन आरोपीने नोकरी न लावता फिर्यादी यांची फसवणूक केली.
पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!