जमिनीवर अनधिकृतपणे मिळवला ताबा,तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड;जमिनीचे साठेखत आणि पावर ऑफ अटॉर्नी तयार केल्यानंतर देखील जमिनीवर ताबा मिळवला. याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ११ एप्रिल २०१६ ते सात जुलै २०२१ या कालावधीत काळेवाडी मधील तांबे शाळेमागे घडला.
भाऊसाहेब कदम (रा. तांबे शाळेमागे, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत रामकृष्ण महादेव पदमने (वय ३३, रा.पडवळनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी काळेवाडी येथे जमीन खरेदी केली आहे. त्यासाठी त्यांनी आरोपींना चार लाख रुपये दिले. त्यानंतर जमीन ताबा, साठेखत आणि पावर ऑफ अटॉर्नी फिर्यादी यांच्या नावे करण्यात आले. त्यानंतर एप्रिल २०१७ ते जुलै २०१७ या कालावधीत संतोष बधाले यांनी फिर्यादी यांनी खरेदी केलेल्या जागेवर ताबा मारल्याचे आढळले. याबाबत फिर्यादी यांनी आरोपी विठ्ठल जाधव यांना विचारणा केली असता. त्यावेळी त्यांनी फिर्यादी यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलिसांत तक्रार केली.सदर गुन्ह्याखाली आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!