परदेशी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेणारा आरोपी गजाआड, सामाजिक सुरक्षा पथकाची कामगिरी

सांगवी;परदेशी महिलांना फ्लॅटमध्ये ठेवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतल्या प्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी (दि. ७) सारी लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव येथे केली.

निलेश नरेश गोस्वामी (वय २२, रा. नेहरुनगर, पिंपरी) असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक धैर्यशील सोळंके यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश हा लक्ष्मीनगर पिंपळे गुरव येथे सृष्टी चौक ते राम कृष्ण मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या शिवमल्हार नावाच्या बिल्डींगमध्ये किशोर कांबळे यांच्या फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होता. त्याने त्या फ्लॅटमध्ये चार परदेशी महिलांना पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी ठेवले. त्या महिलांकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला.

मिळालेल्या रकमेतून आरोपीने स्वतःची गरज भागवली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर सामाजिक सुरक्षा पथकाने कारवाई करत आरोपी निलेश याला अटक केली. आरोपी कडून ८ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम आणि भारतीय दंड विधान कलम 370 (3) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.