धक्कादायक!अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून १ लाख ७२ हजार रुपये घेतले,२अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल
पुणे;पंधरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलावर दोघा अल्पवयीन मुलांनी अनैसर्गिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सहकार नगर पोलिस स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ४८ वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचा १५ वर्षीय मुलगा आहे. धनकवडी परिसरात राहणाऱ्या सतरा वर्षे वयाच्या दोन मुलांसोबत त्याची ओळख झाली होती. दरम्यान फिर्यादी आणि त्यांच्या पत्नी दोघेही दिवसभर कामासाठी घराबाहेर असतात. याचाच गैरफायदा घेऊन या दोन्ही मुलांनी फिर्यादीच्या पंधरा वर्षीय मुलासोबत नोव्हेंबर २०२० मध्ये अनैसर्गिक कृत्य केले.
तसेच त्या दोघांनी मिळून फिर्यादीच्या मुलाचे नग्नावस्थेतील फोटो काढले. त्यातील एका आरोपीने हे नग्नावस्थेतील फोटो पीडित मुलाला दाखवून पोलिसांना सांगण्याची धमकी देत त्याच्याकडे पैसे मागितले. भितीपोटी या मुलाने घरातील कपाटात असणारे पैसे या मुलांना आणून दिले. दोन्ही अल्पवयीन मुलांनी पीडित मुलाकडून वेळोवेळी १ लाख ७२ हजार रुपये घेतले. दरम्यान फिर्यादी यांना कपाटातील पैसे जागेवर नसल्याचे लक्षात आले. त्याविषयी त्यांनी पीडित मुलाला विचारणा केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. सहकारनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!