सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणारा सराईत गजाआड,दरोडा व वाहनचोरी पथक १ गुन्हे शाखेची कामगिरी

सहकारनगर; सरकारी नोकरीचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार जांभुळवाडी रोड, पुणे येथे उघडकीस आला आहे.याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबई रजि नं ४८६/२०२१, भादंवि कलम ४०६,४२०,३४ सदर आरोपी या गुन्ह्यातील गुन्हेगार आहे.

दिपक कांतिलाल पांचाळ, (वय- ४५, रा. व्यंकटेश लेक व्हिस्टा, सी विंग, फ्लॅट नं ८०१, जांभुळवाडी रोड, पुणे)अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,विद्यापीठ पोलीस स्टेशनचे हद्दीत तपास करत असताना गोपनिय बातमीदाराकडुन मिळालेल्या बातमीच्या आधारे दाखल गुन्ह्यातील आरोपी त्याच्या राहत्या घराच्या परिसरात दिसताच मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.मुंबई पोलीस स्टेशनशी संपर्क करुन वरील दाखल गुन्ह्यातील आरोपीबाबत चौकशी व खातरजमा केली असता त्यांनी वरील दाखल गुन्ह्यातील आरोपी हाच असल्याबाबत ची माहिती मिळाली.दाखल झालेल्या गुन्ह्याबाबत आरोपींकडे अधिक चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.आरोपीस भायखळा पोलीस स्टेशन, मुंबई यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त गुन्हे मा. श्री श्रीनिवास घाडगे, सहा.पोलीस आयुक्त मा. श्री. सुरेंद्रनाथ देशमुख, गुन्हे शाखा ०१, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखालील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, पोलीस हवालदार निलेश शिवतरे, पोलीस नाईक अतुल मेंगे, पोना धनंजय ताजणे व पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१, गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.