उधारीचे पैसे मागितल्याच्या रागात केले हत्याराने वार,आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे;उधारीचे पैसे मागण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिघांनी बेदम मारहाण करीत ठार मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बुधवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून,एकास अटक केली आहे.

या प्रकरणी अल्लाबक्ष यासीन शेख (वय ३२) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर महबूब शेख, वसीम मेहबूब शेख आणि अन्य एक अनोळखी इसम ही गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी समीर शेख याने फिर्यादी अल्लाबक्ष शेख यांच्याकडून दोनशे रुपये उदार घेतले होते. हे पैसे मागण्यासाठी अल्लाबक्ष बुधवारी रात्री फिर्यादीच्या घरी गेले होते. उधारीचे पैसे मागत असल्यामुळे आरोपीला राग आला आणि त्यांनी फिर्यादीला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या गळ्यावर पालघन सारख्या हत्याराने वार केले. तर इतर आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली आणि ठार मारण्याचा प्रयत्न केला. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हाखली एका आरोपीला अटक केली आहे.

पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.