डंपर आणि दुचाकीची जोरात धडक,भीषण अपघातात महिलेचा मृत्यू
हिंजवडी; डंपर आणि दुचाकीची जोरात धडक. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा डंपरखाली सापडून जागीच मृत्यू झाला. यामध्ये मृत महिलेचा पुतण्याही गंभीर जखमी झाला ही घटना शुक्रवारी दि. ९ सकाळी दहाच्या सूमारास विनोदेनगर, वाकड येथे घडली.
लक्ष्मी विठ्ठल शिंदे (वय ५०, रा. बाणेर. मूळ रा. बार्शी, जि. सोलापूर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, पुतण्या आकाश शहाजी शिंदे (वय २५) हा जखमी झाला आहे. अविनाश दिनकर यादव (सध्या रा. विनोदेवस्ती,वाकड मूळ रा. पाथर्डी, अहमदनगर) असे अटक केलेल्या डंपर चालकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मी शिंदे गुरुवारी दि. ८ कासारसाई येथे मुलाच्या घरी गेल्या. तेथून सकाळी पुतण्या आकाश याच्या दुचाकीवर मागे बसून बाणेरच्या दिशेने येत होत्या. दरम्यान, विनोदेनगर येथे आरोपी अविनाश चालवत असलेल्या डंपरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे दोघेही रस्त्यावर कोसळले. त्यावेळी डंपरचे मागचे चाक लक्ष्मी यांच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे लक्ष्मी यांचा जागीच मृत्यू झाला. तर, आकाश याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच लक्ष्मी यांचे नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले.लक्ष्मी यांच्या नातेवाईकांनी रस्त्यावर पडलेला मृतदेह हलवण्यास विरोध केला.आधी डंपर चालकाला अटक करा, मगच मृतदेह उचला, अशी मागणी करीत नातेवाईक आक्रमक झाले हिंजवडी पोलिसांनी नातेवाईकांची समजूत घालून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला.
पुढील तपास हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!