पुणे-बंगळूर महामार्गाजवळील नवले पुला वर भीषण अपघात,८ वाहनांचे नुकसान

पुणे;पुणे-बंगळूर महामार्गावरील नवली पुलाजवळ आज सकाळी आठ वाहनांचा विचित्र अपघात झाला.सुदैवाने या अपघातात जीवित हानी
झाली नाही. आठ वाहनांचे मात्र जबर नुकसान झाले आहे.

आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बस भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने आठ वाहनांना धडक दिली.

या अपघातात काही नागरिक जखमी झाले असल्याची माहिती आहे. जखमींना त्वरित नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा येथून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ट्रकचे नवले पुलाजवळ आल्यानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले. त्यानंतर नियंत्रण सुटलेल्या या ट्रकने चार चार चाकी वाहनांना आणि तीन रिक्षाना धडक दिली. यामध्ये काही नागरिक जखमी झाले असल्याची माहिती आहे. तर या सर्व वाहनांचे जबर नुकसान झाले आहे. दरम्यान आज सकाळी सकाळी झालेल्या या अपघाताने बंगळूर महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती, तर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या बाजूला करून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून दिला. पुण्यातील या नवले ब्रिज परिसरात वारंवार अपघात होत असतात. मुंबई बंगलोर बाह्यवळण मार्गावरील बोगद्यापासून ते नवले पुलापर्यंत असलेल्या तीव्र उतारावर वाहनचालक जड वाहने बंद करून चालवत असल्यामुळे हे अपघात होत असल्याचा अंदाज लावला जात आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.