बनावट नंबर टाकुन अवैध गुटखा/पानमसाल्याची वाहतुक करणा-या टेम्पोसह ०३ आरोपी जेरबंद,५२ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

वाकड;बनावट नंबर टाकुन अवैध गुटखा/पानमसाला याची वाहतुक करणा-या टेम्पोसह ०३ आरोपींना वाकड पोलीस स्टेशनचे तपास पथकाने अटक केले आहे.तसेच आरोपीकडून ५२ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गणेश वंजी साबळे वय २९ वर्षे (टेम्पो चालक) रा. मु.पो. धोंगळे ता. साक्री, जि. धुळे,संदिप गुलाब ठाकरे (क्लिनर) वय २७ वर्षे रा. मु.पो. धोंगळे ता. साक्री, जि. धुळे,विशाल पाडूरंगलवाळे (वय २२ रा. मु.पो. उरवडे, ता. मुळशी, जि. पुणे)असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार,पोलीस आयुक्त श्री कृष्णप्रकाश यांच्या अवैध धंदयावावत “ झिरो टॉलरन्स ” या मोहीमे अंतर्गत तपास करत असताना दि.७ रोजी रावेत डांगे चौक या मार्गावर निळ्या रंगाची ताडपत्री असलेली तांबड्या रंगाचा टाटा कंपनीच्या एका टेम्पोमधुन अवैध गुटखा/प्रतिबंधीत पानमसाला वाहतुक करुन विक्रीसाठी नेला जात असल्या बाबतची खात्रीशीर बातमी मिळाली. बातमीच्या अनुषंगाने तपास करत,रावेत – डांगे चौक रोडवर हॉटेल, पुनावळे पुणे येथे सापळा लावला, रात्री २३.३५ वा. सुमारास संशयीत टेम्पो रावेत. ओलांडून डांगे चौकाचे दिशेने येत असताना हॉटेल ब्ल्यु वॉटर, पुनावळे पुणे येथे त्यास थांबवुन संशयीत टाटा टेम्पो नं. MH18/AA/9421 ताब्यात घेऊन आरोपीस अटक केले.

सादर आरोपींकडून प्रतिबंधीत विमल पानमसाला ची १०० पोती कि रु ३९,६०,०००/- रु, व्ही १ तंबाखु ची १०० पोती कि ४,४०,०००/- रु, एक टाटा कंपनीचा टेम्पो कि ८,००,०००/- रु, चार मोबाईल फोन कि २०,०००/- रु असा एकुण ५२ लाख २० हजार/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अटक आरोपींना कोर्टात हजर केले असता दि. १३/०७/२०२१ पर्यत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आली आहे.

सदरची कारवाई मा. श्री. कृष्ण प्रकाश साो. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री. रामनाथ पोकळे साो. अपर पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. श्री.आनंद भोईटे सो,पोलीस उप आयुक्त,परिमंडळ – २ पिंपरी चिंचवड, मा. श्री. श्रीकांत डिसले साो. सहा. पोलीस आयुक्त, वाकड विभाग, पिंपरी चिंचवड यांचे मार्गदर्शनाखाली डॉ. श्री. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वाकड पोलीस ठाणे, श्री संतोष पाटील, पोलीस निरीक्षक(गुन्हे), श्री. सुनिल टोणपे पोलीस निरीक्षक (गुन्हे-२), तपास पथकातील सपोनि संतोष पाटील, पोलीस अंमलदार राजेंद्र काळे, बाबाजान इनामदार, विभीषण कन्हेरकर, विक्रम कुदळ, विजय गंभिरे, नितीन ढोरजे, बापुसाहेब धुमाळ, जावेद पठाण, प्रशांत गिलबीले, वंदु गिरे, नितीन गेंगजे, प्रमोद कदम, अतिश जाधव, सुरज सुतार, मधुकर कोळी, श्याम बाबा, कल्पेश पाटील, तुषार गाडेकर, जितेंद्र उगले, नुतन कोंडे, यांनी केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.