फायनान्सचे ऑफिस मधुन २६ तलवारी जप्त,गुन्हे शाखेची कामगिरी
धनकवडी;पुणे शहरातील धनकवडी परिसरातील एका तरुणाच्या कार्यालयातून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. या तरुणाने त्याच्या कार्यालयात लोखंडी पाट्यापासून तयार केलेल्या वेगवेगळ्या आकाराच्या तबल २६ तलवारी ठेवल्या होत्या.
प्रतीक ज्ञानेश्वर भोसले (वय 33, रा. पार्श्वनाथनगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पोलीस गस्त घालत असताना, दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाचे पोलीस कर्मचारी शिवतरे व ताजणे यांना प्रतीक भोसले याने त्याचे ऑफिस असलेल्या इमारती टेरेसवर तलवारी ठेवल्या असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने धनकवडी येथील ऑफिसच्या इमारतीत छापा टाकल्या असता त्यांना पांढऱ्या रंगाच्या पोत्यात तलवारी लपवून ठेवल्याचे आढळले. प्रतीक भोसले याचे धनकवडी येथे फायनान्सचे ऑफिस आहे. तिथून या तलवारी ताब्यात घेतल्या.गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपीस अटक केली असुन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
सदरची उल्लेखनीय कामगिरी, अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, सहाय्यक उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सुरेंद्रनाथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहाय्यक निरीक्षक जुबेर मुजावर, शाहिद शेख, निलेश शिवतरे, अतुल मेंगे, धनंजय ताजणे, गणेश पाटोळे, सुमित ताकपेरे यांच्या पथकाने केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!