खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील २ फरारी आरोपी जेरबंद,पुणे ग्रामीण पोलिस पथकाची कामगिरी

पुणे;खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरारी असलेल्या दोन आरोपींना दहशतवाद विरोधी पथकाने अटक केले आहे.पुणे ग्रामीण जिल्ह्यात गुरुवारी दि.८ कोम्बिंग ऑपरेशन घेण्यात आले त्यावेळी ही करवाई करण्यात आली.

संकेत निवृत्ती खुडे (वय २५) व ऋषिकेश निवृत्ती खुडे (वय २०) ( रा. मोरवाडी, ता. भोर, जिल्हा पुणे ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड पोलीस ठाणे हद्दीतील खुनाचा प्रयत्नाच्या गुन्ह्यातील फरारी असलेल्या दोन आरोपींना कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान नसरापुर परिसरातून ताब्यात घेतले. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्यांना राजगड पोलीस ठाण्याला सुपूर्द केले आहे.

सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्षाचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विश्वास खरात, पोलीस हवालदार अब्दुल शेख, ईश्वर जाधव, पोलीस नाईक विशाल भोरडे, महेंद्र कोरवी, किरण कुसाळकर, मोसिन शेख, लक्ष्मण राऊत व अरुण पवार या पथकाने केली.सायबर पोलीस स्टेशनचे सुनिल कोळी व चेतन पाटील यांनी तांत्रिक मदत केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.