हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, असह्य होऊन विवाहितेने केली गळफास घेऊन आत्महत्या

चिखली;हुंड्यासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सासरच्या ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आढेगाव आणि जाधवाडी, चिखली येथे घडली.

पती दिनेश आनंद रोकडे, सासरे आनंद रोकडे, दीर नितीन आनंद रोकडे आणि दोन महिला आरोपी (सर्व रा.आडेगाव पोस्ट अबोली ता.खेड जिल्हा पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत मृत विवाहितेच्या आईने शनिवारी (दि.१०) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी सलोनी (वय १९) हिचे १८ ऑक्टोबर २०२० रोजी आरोपी दिनेश रोकडे याच्याशी लग्न झाले. लग्न झाल्यानंतर सासरी नांदत असताना आरोपींनी आपसात संगनमत करून सलोनी हिला तुला स्वयंपाक नीट करता येत नाही. तुझ्या आईने लग्नामध्ये काही हौसमौज केली नाही. तसेच लहान- लहान कारणावरून तिला वाईट शिवीगाळ करून मारहाण केली. तिच्या पतीच्या ओळखीच्या एका महिलेसोबत पतीचे अनैतिक संबंध होते. त्या महिलेचे ऐकून फिर्यादी यांची मुलगी सलोनीला आरोपी मारहाण करत असे.

तसेच व्यवसायासाठी दोन लाख रुपये घेऊन ये, अशी मागणी आरोपी करत होते. ती मागणी पूर्ण न झाल्याने तिला शारीरिक व मानसिक त्रास दिला.या त्रासाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.